मळवंडी ठुले जिल्हा परिषद शाळेला मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या निधीतून तीन लक्ष रूपयाचे खेळाचे साहित्य वाटप

पवनानगर – मावळ लोकसभेचे खासदार श्री. श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या निधीतून आज जिल्हा परिषद शाळा मळवंडी ठुले शाळेला खेळाचे साहित्य देण्यात आले आहे.जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक व काले गावचे उपसरपंच अमित कुंभार यांच्या प्रयत्नातून मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून मळवंडी ठुले शाळेसाठी तीन लक्ष रूपये किंमतीचे खेळाचे साहित्य उपलब्ध झाले.या साहित्याचा लोकार्पण सोहळा शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजुशेठ खांडभोर यांच्या शुभहस्ते मळवंडी ठुले येथे संपन्न झाले.

या कार्यक्रमासाठी मावळ शिवसहकार सेनेचे अध्यक्ष व काले गावचे उपसरपंच अमित कुंभार, तालुका उपप्रमुख मदन शेडगे, पवनमावळ विभाग प्रमुख उमेश दहिभाते, किशोर शिर्के, सचिन कालेकर, शाळेचा मुख्याध्यापक राजेश राऊत, अध्यक्ष वसंत पवार ग्रामपंचायत सदस्य वसंत ठुले,विशाल सांबरे,बबनराव ठुले,अंकुश आखाडे, डिंपल ठुले,शाळेचे अध्यापक सचिन बुटकुले,ऋतुजा जागिरदार,जानकी दाडगे,यांच्यासह सर्व स्थानिक पदाधिकारी तीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व माजी विद्यार्थी, उपस्थित होते.

यावेळी बोलताना खांडभोर म्हणाले की,खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून जास्तीत जास्त निधी आणुन मावळ तालुक्यातील दुर्गम भागात देऊन जास्तीत जास्त विकासकामे करण्यावर भर दिला आहे यापुढील काळातही विकासकामे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार.

यावेळी कालेचे उपसरपंच अमित कुंभार म्हणाले की, खासदार निधीतून पवनमावळातील अनेक गावांसाठी व शाळांसाठी २ कोटींपेक्षा जास्त निधी आणण्यात आला आहे.त्यामध्ये पवना शाळा व मळवंडी ठुले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना खेळाचे साहित्य देण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापक राजेश राऊत यांनी केले सुत्रसंचलन ऋतुजा जागिरदार यांनी केले तर आभार सचिन बुटकुले यांनी मानले.
फोटो- मळवंडी ठुले शाळेत खेळाचे साहित्य शाळेचे मुख्याध्यापक राजेश राऊत यांच्याकडे सुपुर्त करताना तालुका प्रमुख राजूशेठ खांडभोर,अमित कुंभार व इतर

Previous articleभीमाशंकर अभयारण्यात रान गव्याचे दर्शन
Next articleनोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यास अटक