नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यास अटक

आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील २९ वर्षीय तरुणाला परदेशात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून ५ लाख १२ हजार ५०० रुपये घेऊन पसार झालेला वेमुळा प्रसाद याला मंचर पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे.

लांडेवाडी ( ता.आंबेगाव ) येथील किरण सूर्यकांत ढेरंगे यांना नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक करणाऱ्या वेमुळा प्रसाद याला (वय ६१, रा. अंधेरी पूर्व, राज्य) मंचर पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे.

वेमुळा प्रसाद व अश्वनी कुमार रा.पंजाव या दोघांनी परदेशात नोकरीला पाठवतो, असे खोटे सांगून किरण ढेरगे त्यांच्याकडून ५ लाख १२ हजार ५०० रुपये घेऊन फसवणूक केल्याने मंचर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपींबाबत यांच्या ठावठिकाण्याबाबत काहीही माहिती मिळत नव्हती. वेमुळा प्रसाद हा मुंबईचा असल्यामुळे व सहायक क पोलिस निरीक्षक लहु थाटे यांनी पूर्वी मुंबईला नोकरी केलेली असल्यामुळे त्यांना तो अंधेरी पूर्व येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार थाटे व पोलिस जवान शांताराम सांगडे हे मुंबईला तत्काळ रवाना झाले. तेथे वेमुळा प्रसाद मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन संबंधित पोलिस स्टेशनला त्याची माहिती देऊन मंचर पोलिस ठाणे येथे आणून नमूद गुन्ह्यात अटक केले आहे.

वेमुळा प्रसाद याला घोडेगाव न्यायालयात हजर केले असता त्याला बुधवार (दि. १९) पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक लहु थाटे करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, खेड विभाग व सायबर विभाग पुणे ग्रामीणचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Previous articleमळवंडी ठुले जिल्हा परिषद शाळेला मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या निधीतून तीन लक्ष रूपयाचे खेळाचे साहित्य वाटप
Next articleविहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्यांना वनविभागाने दिले जीवदान