वाडेबोल्हाई-केसनंद निकृष्ठ दर्जाचे रस्त्याचे काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करा: रामदास कोतवाल यांची मागणी

अमोल भोसले,उरुळी कांचन

पूर्व हवेली तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या वाडेबोल्हाई-केसनंद या रस्त्याचे चालू असलेले काम वाडेबोल्हाई हद्दीत निकृष्ठ दर्जाचे सुरू असल्याचे समजताच रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा अष्टापुरचे माजी सरपंच रामदास कोतवाल, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुशील शिंदे व रयत शेतकरी संघटनेचे हवेली तालुकाध्यक्ष अनिल कोतवाल, जिल्हा कार्यध्यक्ष हेमंत चौधरी, संपर्क प्रमुख सुमित कोतवाल, युवकध्यक्ष निलेश वारघडे, हवेली तालुक्याचे कार्यध्यक्ष नितीन इंगळे, सचिव पांडुरंग नागवडे, वाडेबोल्हाईचे सरपंच दिपक गावडे, भाजपचे तालुका सरचिटणीस शिवाजीराव गोते, बोल्हाई माता डेकोरेटर्सचे उद्योजक कुमार केसवड, सुभाष तिकोळे, प्रविण भोर, सोमनाथ गावडे, तुषार नागवडे, सह स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनी स्वतःरस्त्यावर येऊन पाहणी करून थांबविले. याप्रसंगी संबंधित कंत्राटदाराचे मुकादम, कामगार वर्ग उपस्थित होते.

यावेळी वाडेबोल्हाई-केसनंद रस्त्याचे वाडेबोल्हाई हद्दीत निकृष्ठ दर्जाचे रस्त्याचे काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा अष्टापुरचे माजी सरपंच रामदास कोतवाल यांनी केली आहे. या वाडेबोल्हाई ते केसनंद या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्षात पाहणी वाडेबोल्हाई हद्दीत केली असता या रस्त्यामध्ये असलेली जुन्या डांबरीवर ठिकठिकाणी जे खड्डे पडले आहेत त्यामुळे डांबरी खराब झाली आहे. परंतु ही डांबरी पूर्णपणे खोंदली नसून न खोंदताच डांबरीच्या वरच्यावर मोठं मोठी खडी टाकली आहे. त्यामध्ये बऱ्याच अंतरावरील मोठ्या खाडीवर जेव्हडे डांबर ओतावे लागते ते ओतले गेले नाही.तसेच जुन्या डांबरीच्या वरच्या वर केलेले रस्त्याच्या प्रथम टप्यातील खडीकरणाचे कामही निकृष्ठ पद्धतीचे झाले असून ठिकठिकाणी केलेल्या कामाची मोठी व छोटी खडी रस्त्याबाहेर पडली आहे,त्यामुळे आत्ता नूतन काम केले आणि लगेच रस्त्यामध्ये खड्डे पडले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यामध्ये टाकलेली छोटी व मोठी खडी रस्त्यात भक्कम न बसता ती रस्त्याच्या दुतर्फा बाजूला बाहेर पडत आहे. याकडे मात्र संबंधित बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.तर या रस्त्याचे संबंधित कंत्राटदार रस्त्याचे काम चालू असून सुद्धा रस्त्याच्या चालू कामाच्या वेळी न थांबता गैरहजर होते. अशी माहिती रस्त्याच्या निकृष्ठ कामाच्या पाहणी प्रसंगी रयत शेतकरी संघटनेच्या उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनी दिली. तसेच रस्त्याचे काम चालू असताना येथून ये-जा करणारे ग्रामस्थ वाहनचालकही रस्त्याचे काम व्यवस्थित होत नसल्याची माहिती देत आहेत. पुणेतून केसनंद मार्ग रस्ता हा हवेली तालुक्यातील धार्मिक तीर्थक्षेत्र बोल्हाई देवीला जाणारा महत्वपूर्ण रस्ता असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे सुरू आहे,बऱ्याच वर्षानंतर हे नुतन काम होत आहे आणि ते जर निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. अन्यथा हे काम आम्ही बंद करून संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी, संबंधित कंत्राटदार यांच्या विरोधात आंदोलन करू.हे काम त्वरित बंद करून उत्तम दर्जाचे काम पुन्हा सुरू करावेत अशी माहिती देताना रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा अष्टापुरचे माजी सरपंच रामदास कोतवाल, वाडेबोल्हाईचे सरपंच दिपक गावडे, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुशील शिंदे व रयत शेतकरी संघटनेचे हवेली तालुकाध्यक्ष अनिल कोतवाल,आदींनी सांगितले.

हे चालू असलेले निकृष्ठ दर्जाचे काम आम्ही जागेवरच थांबविले असून या कामाचे संबंधित वरिष्ठ बांधकाम खात्याचे अधिकारी व कंत्राटदार यांना संपर्क साधून या कामाची पाहणी करून हे काम यापुढे दर्जेदार व्हावेत. तसे जर पुढे झाले नाही तर हे काम आम्ही पुन्हा थांबवू व रयत शेतकरी संघटना व स्थानिक ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करु. अनिल कोतवाल, तालुकाध्यक्ष-रयत शेतकरी संघटना.

रस्त्याची कामाची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी आमच्या रस्ते बांधकाम खात्याचे संबंधित उपअभियंतासह रस्त्याची तपासणी करण्यासाठी टीम पाठवू,जर पाहणी वेळी रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे आढळल्यास ते काम रिजेक्ट करून थांबविले जाईल.
-अजय भोसले,वरिष्ठ बांधकाम अभियंता.

जर रस्त्यांचे काम निकृष्ठ पद्धतीने चालू असेल तर स्थानिक ग्रामस्थांनी त्या कामाची पाहणी करून ते निकृष्ठ दर्जाचे काम थांबविलेच पाहिजे.संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांनी रस्त्याचे दर्जेदार काम करावे. अन्यथा निकृष्ठ काम केल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल.
-अँड.अशोक पवार,आमदार-शिरूर,हवेली

Previous articleगोलेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी पै.बाळासाहेब चौधरी यांची निवड
Next articleहिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय (भाई) देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न