हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय (भाई) देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

चाकण- हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय (भाई) जयराम देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार (दि. १४) रोजी हिंदूराष्ट्र सेना-खेड तालुका सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनेक वैद्यकिय उपक्रम राबविले.

यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबीर,मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया, मोफत बी. पी व डायबेटीस तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप, इत्यादी वैदयकीय उपक्रमांचा समावेश होता. हे शिबीर वासुली फाटा, हिंदूराष्ट्र सेना कार्यालय इथे आयोजित केले होते .या शिबीरात सुमोरे शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी हिंदूराष्ट्र सेनेचे रविंद्र कड़, राजु सैंधळ, कृष्णा जाधव, सुहास जाधव, संतोष पिंजण, प्रदीप जाधव, विष्णु कोडे, अनुप गाडे, अॅड. अविनाश होते. गोपी लुळवे, बाली कुलकर्णी शिवाजी डावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleवाडेबोल्हाई-केसनंद निकृष्ठ दर्जाचे रस्त्याचे काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करा: रामदास कोतवाल यांची मागणी
Next articleआकाश भोकसे यांची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड