हवेली तालुका राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीने क्रांतीज्योती साविञीबाई फुले पुरस्कार सोहळा संपन्न

उरुळी कांचन

शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना साविञीबाई फुले या नावाने पुरस्कार देऊन गौरव करणे हा ख-या अर्थाने सन्मान करणे हे कौतुकास्पद आहे. शिक्षण देण्याचा प्रचार आणि प्रसार महात्मा फुले आणि साविञीबाई फुले यांनी केला. कोरोनाच्या काळात शिक्षक वर्गानी घरोघर जाऊन सर्वे करणे सोपे नसताना ते काम शिक्षक बांधवांनी केले. आपण योग्य व्यक्तीच्या नावाने पुरस्कार कार्यक्रम घेतलात असे मनोगत हवेली ता. राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

हवेली तालुका राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीने क्रांतीज्योती साविञीबाई फुले पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी वाल्हेकर बोलत होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

यावेळी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त महादेव कांचन, संस्थेचे विश्वस्त खजिनदार राजाराम कांचन, जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, मा.सरपंच आण्णा महाडिक, जानाई डेव्हलपर्सचे अध्यक्ष सागर कांचन, शिवनेरी समुहाचे उद्योजक सोमनाथ शेलार, शिवाजी किलकिले, अरुण थोरात, सुधाकर जगदाळे, कल्याण बर्डे, प्राचार्य बबन दिवेकर, मा.उपसरपंच संचिता कांचन, मुख्याध्यापक संघाचे सचिव सुरेश कांचन, हवेली तालुका सचिव प्रा.सुरेश वाळेकर, मा.पर्यवेक्षक बाळकृष्ण काकडे, डॉ. संजय भागवत, संगिता शिर्के, जीवन शिंदे, सुरेश कांचन, संजय कांचन, विजय तुपे, गो.ग.जाधव, राष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमामध्ये एकुण २७ पुरस्कार देण्यात आले. यापैकी गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक ,आणि गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी यांना पुरस्कार देऊन सन्माननीत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश कांचन यांनी केले. सुञसंचालक प्रा.सुरेश वाळेकर यांनी केले तर आभार महेश पवार यांनी मानले.

Previous articleमाजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
Next articleप्रधानमंत्री पीक योजना समितीच्या सदस्यपदी नंदकुमार चौधरी यांची निवड