जुन्नर तालुक्यात ५०२ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३५३ रुग्ण बरे होऊन घरी

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५०२ एवढी वाढली असताना आज पर्यंत ३५३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ही दिलासादायक बातमी आहे. मात्र नारायणगाव येथील एका ८० वर्षीय वृद्धाचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
दरम्यान आज तालुक्यामध्ये केवळ ४ पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

आजपर्यंत जुन्नर तालुक्याची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांंची संख्या ५०२ एवढी झाली असून आजपर्यंत २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  यापैकी ३५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १२७ एवढी आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे व डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

आज नारायणगाव येथे २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सावरगाव येथील काचळवाडी व ओतूर येथे प्रत्येकी एक असे आज एकूण ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान सर्वांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहे. प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे.

Previous article‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत- उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleदौंडमध्ये स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट चे वाटप