दौंडमध्ये स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट चे वाटप

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड स्मशानभूमी सुधार समिती व दौंड नगरपालिका यांच्या वतीने स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना मास्क,गमबुट,सॅनिटायजर, हॅन्डग्लोज,डेटॉल साबण व इतर सुरक्षा साहित्य चे वाटप करण्यात आले,कोविड कोरोना चा प्रादुर्भाव सर्वत्र दिसून येत आहे, या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचारी या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, हे काम करत असताना कित्येक अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना ची बाधा झाल्याचे दिसून येत आहे, अशाही परिस्थितीत हे कोविड योद्धे बरे होऊन पुन्हा लोकसेवा करण्यासाठी रुजू होत आहे,आशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी सुरक्षा किट चे वाटप करण्यात स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत, यातच हिंदू स्मशान भूमी सुधार समिती ने कर्मचाऱ्यासाठी सुरक्षा किटचे केलेले वाटप, त्यांच्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहे,यावेळी समिती चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते