नायगाव ग्रामपंचायत तर्फे  नवीन वर्षानिमित्त नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण योजना

अमोल भोसले,उरुळी कांचन

नायगाव (ता. हवेली) येथील नागरिकांसाठी ग्रामपंचायतच्या वतीने घरपोच शुद्ध व थंड पाणी पाच रुपयात वीस लिटर योजना दि. १ जानेवारी २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे त्याचे उद्घाटन राजेंद्र चौधरी माजी प्रभारी सरपंच व संस्थापक नायगाव पत्संस्था तसेच सरपंच गणेश चौधरी उपसरपंच पल्लवी गायकवाड सर्व सदस्य व माजी पदाधिकारी बायफ संस्थेचे अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले

त्यासाठी बायफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान उरुळी कांचन यांनी आवश्यक ती सर्व मदत केली असून त्यांच्या सहकार्यामुळे कमी दरात घरपोच शुद्ध पाणी पुरविणे शक्य झाले आहे अशी माहिती सरपंच गणेश गुलाब चौधरी यांनी दिली. शुद्ध पाणी वितरण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर वितरण समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये बायफ संस्थेचे दोन प्रतिनिधी तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ प्रतिनिधी आहेत.

बायफ संस्थेच्या वतीने फिल्टर प्लांट व वितरण व्यवस्थेसाठी गाडी देण्यात आली आहे शुद्ध पाण्याची गुणवत्ता ठेवण्यासाठी त्यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे यावेळी बाहेरचे प्रकल्प अधिकारी मानसिंग कड व सल्लागार सिंग यांचा पंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सदस्य कल्याणी हागवणे, जितेंद्र चौधरी, दत्तात्रय बारवकर, उत्तम शेलार, बाळासाहेब गायकवाड, अश्विनी चौधरी, आरती चौधरी, संगीता शेलार, प्रियंका गायकवाड, माया चौधरी, माजी उपसरपंच ज्ञानोबा शेलार, विजय चौधरी, गणेश चौधरी, रामचंद्र पवार, संतोष हगवणे, संजय कामठे, सुनील हगवणे, कैलास चौधरी, पोपट चौधरी, उत्तम घुले, अमोल चौधरी, नितीन हगवणे, नवनाथ गायकवाड, विजय चौधरी, बाप्पू चौधरी, योगेश चौधरी, नंदू चौधरी, संजय चौधरी, मुकिंदा गुळजकर, गोरख चौधरी, अर्जुन चौधरी , सुभाष मांढरे इत्यादी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleआळंदीत शेजारी राहणाऱ्या महिलेचे नवऱ्यासोबत लफड असल्याच्या संशयावरून दोन महिलांची तुंबळ हाणामारी
Next articleविद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी ग्राहक जागरण कार्यशाळा उत्साहात