आळंदीत शेजारी राहणाऱ्या महिलेचे नवऱ्यासोबत लफड असल्याच्या संशयावरून दोन महिलांची तुंबळ हाणामारी

आळंदी- शेजारी राहणाऱ्या महिलेचे नवऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून घरात घूसून दोन महिलांची तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवार ( दि.२ ) सकाळी सातच्या सुमारास आळंदी येथील वडगाव रोडवरील झोपडपट्टीत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एकमेकांच्या घरात जबरदस्तीने घुसून लाथाबुक्क्यांनी, हाताने मारहाण केली. तसेच केसांना धरून बाहेर ओढत नेऊन विटा फेकून मारल्या. या हाणामारीत घरातील महिला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. पुढील तपास आळंदी पोलीस करीत

Previous articleकनेरसर शाळेत बालिका दिन साजरा
Next articleनायगाव ग्रामपंचायत तर्फे  नवीन वर्षानिमित्त नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण योजना