उरुळी कांचन येथील ड्रिम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबीरात ३१९ जणांनी केले रक्तदान

अमोल भोसले,उरुळी कांचन

रक्तदान हेच जीवनदान- रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान. रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. रक्त अनेकदा वेळेवर मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. उरुळी कांचन येथील ड्रिम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सामाजिक भावनेतून रक्तदान शिबीर घेऊन स्तुत्य उपक्रम राबविला असल्याचे मत जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य महादेव कांचन यांनी व्यक्त केले.या रक्तदान शिबिर मध्ये ३१९ जणांनी सहभाग नोंदवला यामध्ये ३०२ पुरुष व १७ महिलांनी रक्तदान केले.

उरुळी कांचन देवस्थान ट्रस्टच्या मालकीचे उरुळी कांचन देवस्थान समितीच्या अखत्यारीतील राम इनामाची सुमारे साडेसात एकर क्षेत्र उरुळी कांचनच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी ९९ वर्षाच्या भाडेकरार तत्वावर देण्याची घोषणा उरुळी कांचनचे ज्येष्ठ नेते प्रा. के.डी. बापू कांचन यांनी यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरुन बोलताना केली.

यावेळी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त प्रा के.डी.कांचन, खजिनदार राजाराम कांचन, जि.प.सदस्या कीर्ती कांचन, प.स.सदस्या हेमलता बडेकर, ग्रा.प.सदस्य भाऊसाहेब कांचन, अमित कांचन, सुनिल तांबे, शंकर बडेकर, आदित्य कांचन, प्राचार्य बबन दिवेकर, मा.सरपंच दत्तात्रय कांचन, सिमा कांचन, संतोष चौधरी, किरण वांझे, शांताराम चौधरी, अजिंक्य कांचन, शैलेश बाबर, महादेव काकडे, शैलेश गायकवाड, सोमनाथ बगाडे, जिल्हा समन्वयक सुनिल जगताप, सचिन माथेफोड, जयदीप जाधव, अमोल अडागळे, हनुमंत चिकणे, आशुतोष तुपे, संजय कांचन, आदी ग्रामस्वच्छता अभियान गुप्रचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनारायणगावचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे झाले सेवानिवृत्त
Next articleचारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून