नारायणगावचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे झाले सेवानिवृत्त

नारायणगाव ,किरण वाजगे

मुंबई पोलीस, सीआयडी, वाहतूक विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच पालघर येथील साधु हत्याकांडाचा यशस्वी तपास करणारे नारायणगावचे पोलीस निरीक्षक विलास शंकर देशपांडे हे शुक्रवार (दि ३१ )जानेवारी रोजी नारायणगाव येथे सेवानिवृत्त झाले.

या कार्यक्रमासाठी जुन्नर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक सानिल धनवे, दक्षता कमिटी सदस्या प्रिती शिंगोटे, प्रिती कुंभार, अर्चना पडवळ, पोलीस पाटील सुहास थोरात (खोडद), गणेश शिंदे (वैशाख खेडे), सुशांत भुजबळ (वारुळवाडी), केतन कावळे तसेच विविध वृत्तवाहिनी व प्रिंट मीडियाचे पत्रकार ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

अवघे साडे चार महिने नारायणगाव येथे कार्यरत असताना आपल्या मृदू स्वभाव आणि प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर देशपांडे यांनी सर्वांच्याच हृदयसिंहासनावर विराजमान होण्याचा मान मिळवला. एवढेच नव्हे तर त्यांनी अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपींना जेरबंद करून विविध समस्यांमध्ये यशस्वी मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यावेळी जड अंतकरणाने कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी, पत्रकार, पोलीस दक्षता समिती, पोलीस पाटील यांना देखील गहिवरुन आले.

या कार्यक्रमात सर्व उपस्थितांसह पोलीस निरीक्षक विलास देशपांडे हे कुटुंबासहित भावुक झाले होते. सहाय्यक पोलीस फौजदार कोकणे, केंगले तसेच पत्रकार किरण वाजगे प्रीती शिंगोटे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय वारुळे यांनी केले तर उपनिरीक्षक धनवे यांनी आभार मानले.

Previous articleअवैद्य बनावट दारूचा साठा जप्त ; खेड तालुक्यातील दोघांना पोलीस कोठडी
Next articleउरुळी कांचन येथील ड्रिम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबीरात ३१९ जणांनी केले रक्तदान