चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून

नारायणगाव ,किरण वाजगे

चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असल्याची माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. ही घटना कांदळी, नगदवाडी (ता.जुन्नर) येथील शिंदे मळा शिवारात घडली.

संध्या सुरेश शिंदे (वय ५१) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सुरेश दगडू शिंदे (वय ५९ रा शिंदे मळा नगदवाडी, कांदळी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून या बाबतची फिर्याद आरोपी चा मुलगा सुशांत सुरेश शिंदे (वय ३१ वर्षे रा. शिंदे मळा, नगदवाडी, कांदळी) यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुरेश याला पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय होता व यावरून दोघांमध्ये अनेक वेळा भांडणे होत होती.

२ जानेवारी रोजी रात्री १२.३० च्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली आरोपी सुरेश यांनी मद्यप्राशन केले होते व त्यात त्याने चारित्र्याचा संशयाचा राग मनात धरून पत्नी संध्या चा हाताने गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर आरोपी सुरेश नारायणगाव येथे येऊन एका ठिकाणी बसला होता. पोलिसांनी त्याचा तात्काळ तपास लावून ताब्यात घेतले व त्याची विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सानील धनवे करीत आहे.

Previous articleउरुळी कांचन येथील ड्रिम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबीरात ३१९ जणांनी केले रक्तदान
Next articleअखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढचे पाऊल पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न