धक्कादायक ! पुणे पोलीस दलातील महिला पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

पुणे – शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शिल्पा चव्हाण या सध्या शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी म्हणून काम पहात होत्या. आज (शुक्रवारी) आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.या घटनेमुळं प्रचंड खळबळ उडाली आहे

शिल्पा चव्हाण यांनी विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर भागात राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दरम्यान,चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली आहे हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

Previous article तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग सज्ज; वाढत्या रुग्ण संख्येने पुन्हा चिंतेचे वातावरण
Next article९ लाख १४ हजार ४३२ रुपयांचा बनावट दारू साठा व मुद्देमाल हस्तगत