भामा आसखेड असणारे शेरे काढण्यासाठी संदीप भोंडवे नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलन

अमोल भोसले,उरुळी कांचन

खेड, हवेली, दौंड तालुक्यातील भामा आसखेड सातबारा वरील असणारे कब्जेदार सदरी आसणारे शेरे काढण्यासाठी मरकळ ग्रामस्थाच्या वतीने जल समाधी आंदोलन करण्यात आले. ग्रामस्थाच्या म्हणण्यानुसार आमच्या सातबारा वरील आसणारे कब्जेदार शेरे ताबडतोप काढावे नाहीतर आम्ही पाण्याच्या बाहेर येणार नाही.

यावेळी महसुल विभागाच्या वतीने मंडल आधिकारी प्रांत अधिकारी यांनी निवेदन घेऊन आले परंतु आंदोलन कर्त्यानी ते नाकारले. जिल्हा अधिकारी यांच्या सहिचे पञ आले तरच आंदोलन मागे घेऊ अन्यथा घेणार नाही. नतंर जिल्हा अधिकारी यांच्या सहीचे पञ आले. नतंर सर्व आंदोलन कर्ते बाहेर आले. या वेळी प्रशासनातील आधिकार्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

यावेळी ग्रामस्थासह संदिप भोंडवे, किरण लोखंडे, प्रसाद घेनंद, तुकाराम वहिले, संभाजी ढमढरे, पाटील गवारे आसे अनेक हवेली, खेड, दौंड तालुक्यातील मान्यवर या आंदोलनात सहभागी झाले होते.

Previous articleनांदूर येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न
Next articleनारायणगावात ‘ओमायक्रॉन’ चा आणखी एक रूग्ण : रुग्णांची संख्या झाली आठ