नांदूर येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न

दिनेश पवार,दौंड

नांदूर (ता.दौंड) येथे ग्रामनिधी व जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते ( दि.२०) रोजी संपन्न झाला.

रस्ते काँक्रीट करणे,बंधीस्त गटार योजना,परिसर सुशोभीकरण करणे,सभामंडप सुशोभीकरण करणे,आर.ओ. प्लांट बसवणे,अंगणवाडी बांधणे, ग्रामपंचायत कार्यालय नुतनीकरण करणे अशी विविध एक कोटी 51 लाख रुपयांची कामे जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निधीतून करण्यात येत आहेत यावेळी ज्योती झूरुंगे, विशाल थोरात, विकास कदम, गणेश कदम, सुशांत दरेकर, सरपंच लता थोरात व सर्व सदस्य पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleचाकणमध्ये भरदिवसा घरफोडी: एक लाख पस्तीस हजारांचा ऐवज लंपास
Next articleभामा आसखेड असणारे शेरे काढण्यासाठी संदीप भोंडवे नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलन