चाकणमध्ये भरदिवसा घरफोडी: एक लाख पस्तीस हजारांचा ऐवज लंपास

चाकण मध्ये एका घरात चोरी करून चोरट्यांनी एक लाख पस्तीस हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.याप्रकरणी सलतमश समशुद्दीन काझी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

चोरट्यांनी घरातील लाकडी कपाट तोडून कपाटातून एक लाख वीस हजारांचे चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण आणि १५ हजारांची सोन्याची अंगठी असा एकूण एक लाख ३५ हजारांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील चाकण पोलीस तपास करीत आहेत

Previous articleवढु बुद्रुक येथे उभारण्यात येणार स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक ; स्मारकाच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंजूरी
Next articleनांदूर येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न