शेतकऱ्यांच्या वीजतोड मोहिमे विरोधात भाजपच्या वतीने महावितरणला निवेदन देणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक ; भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा नोंदवला निषेध

उरुळी कांचन

शेतकऱ्यांच्या थकित वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीजतोड मोहिम महावितरण विभागाने तीव्र केली आहे. फिडर पासुन डिपी बंद करणे तसेच वीज कट करणे आदी प्रकार पूर्व हवेली मध्ये सुरु असल्याचा आरोप भाजप तालुकाध्य संदिप भोंडवे यांनी केला आहे.

या विरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून लोणी काळभोर पोलिसांना कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याची परवानगी माघितली असताना परवानगी नाकारण्यात आल्यानंतर भाजप हवेली तालुक्याच्या वतीने उरुळी कांचन येथे शांततामय रीत्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी प्रमुख पदाधिकारी यांना अटक केली. याप्रसंगी महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध नोंदवला.

यावेळी पुणे -जिल्हा संपर्क प्रमुख धर्मेंद्र खांडरे ,जिल्हा उपाध्यक्ष प्रविण काळभोर , पंचायत समिती सदस्य श्यामराव गावडे , पश्चिम महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, सुदर्शन चौधरी, गणेश कुटे, अजिंक्य कांचन, श्रीकांत कांचन, अमित कांचन, गणेश चौधरी, भाऊसाहेब कांचन, पुनम चौधरी, विजय जाचक, निलेश कानकाटे, गुरुनाथ मचाले, प्रशांत कोतवाल, अभिजित महाडिक, जयेश जाधव, ऋषीकेश शेळके, ओंकार कांचन, शुभम वलटे, पुजा सणस, राहुल चोरघे, सूर्यकांत जाधव आदी उपस्थित होते.

Previous articleनारायणगाव महाविद्यालयात बँकिंग करिअर मार्गदर्शन कार्यशाळा
Next articleजुन्नर पाठोपाठ खेड तालुक्यात सुद्धा ओमायक्राॅनचा शिरकाव ! एक रूग्णाची नोंद !