नेहरू युवा केंद्र व समाजभूषण गणपतराव काळभोर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जल जागरण प्रशिक्षण

https://youtu.be/QEtrmJF2L44

अमोल भोसले,उरुळी कांचन

नेहरू युवा केंद्र पुणे, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार ,समाजभूषण गणपतराव काळभोर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी काळभोर येथे जल जागरण अभियान प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला समाजभूषण गणपतराव काळभोर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिलकुमार कुरणे, उपप्राचार्य बाळासाहेब जगताप, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.विजयकुमार घोडके व डॉ. ए के मंजुळकर, प्रा.स्नेहा बुरगुल तसेच नेहरु युवा केंद्राचे हवेली तालुका राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रियांका बोगाळे आणि सचिन कदम व माजी राष्टीय युवा स्वयंसेवक प्रविण मोरे उपस्थित होते.

डॉ. ए के मंजुळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून देताना जल जागरण अभियानचे महत्व सांगितले. या प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित महाविद्यालयीन तरुण-तरुणींना प्रविण मोरे यांनी जलसाक्षरता विषयावर मार्गदर्शन केले. “वाचवलेल्या पाण्याचा एक थेंबही देशाच्या विकासामध्ये मोठा हातभार लावू शकतो, ही भावना मनात ठेवली, तर देशाला जलस्वयंपूर्ण बनण्यात कोणताच अडथळा येणार नाही. यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन लोकचळवळ उभी करायला हवी असे मत प्रविण मोरे यांनी व्यक्त केले. यावेळी ‘ भूजलगाथा ‘ आणि ‘ थेंबे थेंबे तळे साठे’ हे २ माहितीपट दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विजयकुमार घोडके यांनी केले तर आभार प्रा.स्नेहा बुरगुल यांनी मानले.

Previous articleशंभर झाडांचे वृक्षारोपण करुन पक्ष्यांचा ज्युसबारचा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा
Next articleविलोभनीय दृश्य