गोरख कामठे यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान

अमोल भोसले,उरुळी कांचन

फुरसुंगी येथील गोरख बाजीराव कामठे यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार नुकताच प्रदान झाला. सुर्योदय प्रतिष्ठान पुणे संचलित आनंदी घर यांच्या माध्यमातून यावेळी संस्थापिका अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, सचिव महेंद्र पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

जाणीव निसर्गप्रेमी फाउंडेशन पुणे संचालक गेली पाच वर्षांपासून वडकी कानिफनाथ मंदिर परिसरात हजारो वृक्षारोपण आणि संवर्धन सुरु आहे. विशेष पोलीस आधिकारी म्हणून हडपसर पोलीस स्टेशन अंतर्गत कोरोना काळात नाकाबंदी, गस्त, प्रवासी पास जनतेला मदत इत्यादी कामे करत आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून अनेक लोकांना बेड, प्लाझा, रक्तदान, इंजेक्शन, बील कमी करण्यासाठी मदत गोरख बाजीराव कामठे यांच्या व मित्रपरिवार वतीने प्रयत्न झाला.

समाजातील सर्व घटकांची सेवा करत असताना अशा प्रकारे पुरस्कार मिळतो तेव्हा काम करत असताना उर्जा स्फूर्ती मिळत असल्याचे गोरख कामठे यांनी सांगितले.

Previous articleशरद पवार, माझ्या शब्दात” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
Next articleविघ्नहर देवस्थान रस्त्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्याकडून ११ लाखांचा निधी; नारायणगाव व ओझर येथे डॉ गोऱ्हे यांचा सत्कार