अष्टापूरला भीम आर्मी भारत एकता मिशन कडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

अमोल भोसले,उरुळी कांचन

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशी शिकवण दिली आहे की जीवनामध्ये शिक्षण सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनी वही पेन जर विद्यार्थींना वाटप केली तर तीच खरी आदरांजली ठरेल असे मत भीम आर्मी हवेली तालुका अध्यक्ष केतन निकाळजे यांनी केले.

भीम आर्मी भारत एकता मिशन कडून सर्वांना आव्हान करण्यात आले होते की आपण गावोगावी एक वही एक पेन अभियान राबवावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशी शिकवण दिली आहे की जीवनामध्ये शिक्षण सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनी वही पेन जर विद्यार्थींना वाटप केली तर तीच खरी आदरांजली ठरेल. या हेतूने आज अष्टापूर मध्ये पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप युवा नेते योगेश जगताप, पंचशील प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष निकाळजे व पंचशील प्रतिष्ठान अध्यक्ष व भीम आर्मी हवेली तालुका अध्यक्ष केतन निकाळजे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण कोतवाल व सचिन निकाळजे, मुख्यद्यापक कांबळे, सा.कार्यकर्ते गणेश कोतवाल तसेच पंचशील प्रतिष्ठान चे सदस्य ज्ञानेश्वर निकाळजे, भावेश झेंडे, विकास निकाळजे
,सागर निकाळजे, जितेंद्र निकाळजे, रवि पाटोळे, पोपट पाटोळे, शरद निकाळजे, संदीप निकाळजे, विशाल निकाळजे, संजय निकाळजे, नितीन निकाळजे, नितीन पवार, किरण निकाळजे, रोहन निकाळजे, रोहित निकाळजे इत्यादी उपस्थिती हो

Previous articleरेटवडी येथे मोफत डिजिटल सातबारा वाटप
Next articleपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवणुकीसाठी शिवसेना सज्ज