पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवणुकीसाठी शिवसेना सज्ज

नारायणगाव,किरण वाजगे

आकुर्डी येथील शिवसेना भवन मध्ये दि. ४ व ५ डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवड चे शिवसेना संपर्कप्रमुख तथा मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य अँड वैभव थोरात यांनी प्रभाग निहाय बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांबरोबर थेट संवाद साधला. प्रभागा मधील शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडी यांची संघटनात्मक बांधणी, प्रभागातील समस्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार आदी विषयांवर सखोल चर्चा व माहिती घेण्यात आली.

शिवसेना घराघरात पोहचवण्यासाठी तसेच शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले कार्य व घेतलेले निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी “माझी जबाबदारी, शिवसेना घरोघरी” असा नारा शिवसैनिकांना देण्यात आला.

बूथ मधील ट्रूथ (truth) शोधून काम करणारे बूथनिहाय, बूथप्रमूख व BLA हे १५ दिवसात नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अँड वैभव थोरात यांनी प्रभागातील पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या बरोबर थेट संवाद साधल्यामुळे शिवसैनकांमध्ये उस्ताह निर्माण झाला. पिंपरी चिंचवड मध्ये १०० हून अधिक शाखा एका महिण्याच्या आत निर्माण करण्यावर बैठकांमध्ये भर देण्यात आला.

बैठकांसाठी शिवसेना शहर प्रमुख अँड सचिन भोसले, उर्मिला काळभोर, योगेश बाबर, राजेश वाबळे, वैशाली मराठे, अनिता तुतारे, विजय साने, बाळासाहेब वाल्हेकर, निलेश हाके, माऊली जगताप, हरेश नकाते,संतोष सौंदकर, रोमी संधू, नगरसेवक प्रमोद कुटे, सागर शिंदे, अमोल निकम, नाना काळभोर, फारुख शेख, जितेंद्र ननावरे, साधना तरस, अरुण गोणते, सचिन चिंचवडे, श्रीमंत गिरी, सुधाकर नलावडे, गोरख पाटील , सुधीर कुंभार, विशाल चव्हाण, नितिन दर्शिले, प्रदीप दळवी,अमित सुवासे, मछिंद्र देशमुख, सुदर्शन देसले, दिपक ढोरे, अमित निंबाळकर, चेतन शिंदे, प्रशांत कडलक, बशीर सुतार, सय्यद पटेल, प्रदीप साळुंखे, गोरख नवघेणे, अनिल पारचा,दत्ताराम साळवी,नामदेव घुले, संदीप भालके,किरण दळवी,शिवाजी पाटील,संदीप येलवांढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleअष्टापूरला भीम आर्मी भारत एकता मिशन कडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप
Next articleगोसासीमध्ये जलसमृद्धी प्रकल्पाचे उद्घाटन