भाजपाच्या हवेली तालुका उपाध्यक्षपदी शिवाजी महाडिक यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

भारतीय जनता पार्टी हवेली तालुका उपाध्यक्षपदी शिवाजी महाडिक यांची तर भारतीय जनता पार्टी हवेली तालुका अध्यक्ष झोपडपट्टी संघपदी आबासाहेब चव्हाण यांची.. तर भारतीय जनता पार्टी हवेली तालुकाध्यक्ष कायदा आघाडीपदी वकील भाऊसाहेब कांचन यांची..तर भारतीय जनता पार्टी हवेली तालुकाध्यक्ष प्राध्यापक आघाडी (प्रज्ञा सेल) पदी प्रा किशोर फडतरे यांची.. तर भारतीय जनता पार्टी हवेली तालुकाध्यक्ष शिक्षक आघाडी पदी काळूराम खोमणे यांची निवड करण्यात आली. उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पुणे महानगर विकास प्राधिकरण निवडणूकीत भाजपाचे उमेदवार स्वप्नील उंद्रे निवडून आल्याबद्दल हवेली तालुका भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार राहूल कुल, माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य रोहीदास उंद्रे, तालुका अध्यक्ष भाजप संदीप भोंडवे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, पश्चिम महाराष्ट्र व्यापारी आघाडी अध्यक्ष विकास जगताप, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, क्षेत्रिय रेल्वे समिती सदस्य अजिंक्य कांचन, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष अमोल शिवले, ओबीसी प्रदेश सरचिटणीस सारिका लोणारी, महिला उपाध्यक्ष पुनम चौधरी, उरुळी कांचन शहर अध्यक्ष अमित कांचन, शहर विद्यार्थी अध्यक्ष ऋषीकेश शेळके, सोशल मीडिया शहर अध्यक्ष शुभम वलटे, यांच्यासह शिरुर हवेली मधील प्रमूख भाजपाचे पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते.

Previous articleमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
Next articleराज्यात अनैतिक युती करून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं -वासुदेव काळे ,प्रदेश अध्यक्ष भाजपा किसान मोर्चा