राज्यात अनैतिक युती करून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं -वासुदेव काळे ,प्रदेश अध्यक्ष भाजपा किसान मोर्चा

सचिन आव्हाड

आजचे आंदोलन हे या आघाडी सरकारला आपण देत असलेला इशारा आहे .आज नऊ दिवस झाले संपूर्ण राज्यातील विद्युत पुरवठा या सरकारने बंद केला आहे . अनैतिक युती करून हे सरकार सत्तेत आलेलं आहे . राज्यात अलिबाबा आणि ४० चोरांची टोळी सत्तेत आलेली आहे असा घणाघाती आरोप भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांनी केला .

वीज पंपाची वीज तोडु नये , तोडलेली वीज कनेक्शन तातडीने जोडावेत , शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येऊ नये या मागण्यांसाठी भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालय दौंड येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले . भाजपा किसान मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले . यावेळी काळे हे बोलत होते .

आटली की बाटली कचकन फुटली … वीज पुरवठा खंडित करायला लाज नाही वाटली …खंडित वीज पुरवठा सुरू झालाच पाहिजे… शेतकरी एकजुटीचा विजय असो , एकच चर्चा किसान मोर्चा , अरे कोण म्हणतो देत नाय … घेतल्याशिवाय राहत नाही अशी घोषणाबाजी या आंदोलना वेळी आंदोलकांनी केली .

यावेळी दौंड तालुका भाजपा अध्यक्ष माऊली ताकवणे ,भाजपा नेते गणेश आखाडे , भाजपा कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस मनोज फडतरे ,अशोकराव फरगडे, शामराव आबा ताकवणे , संचालक तुकाराम आवचर, राजाभाऊ बुऱ्हाडे,
जिल्हा उपाध्यक्ष वैभव आटोळे , अभिमन्यू गिरमकर, गोरख गाढवे, रवीनाना दोरगे , फिरोज खान ,माऊली शेळके , केशव काळे , डॉ . मधुकर आव्हाड , गणेश कुरुमकर, गणेश शितोळे , संजय शिंदे , विशाल खंडाळे यांसह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .

Previous articleभाजपाच्या हवेली तालुका उपाध्यक्षपदी शिवाजी महाडिक यांची निवड
Next articleपिकअपच्या धडकेत दोन महिला वारकऱ्यांचा मृत्यू