पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या उपाध्यक्षपदी आनंद वैराट यांची निवड: खा.कोल्हे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

अमोल भोसले,उरुळी कांचन

आंबेडकरी चळवळीतील कार्याची दखल घेऊन आनंद शिवाजी वैराट यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जितेंद्र बडेकर यांनी सदरची निवड केली. शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार संसदरत्न डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते आनंद शिवाजी वैराट यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर , ग्रामपंचायत सदस्य मयूर कांचन, माजी सरपंच आण्णा महाडिक, जानाई डेव्हलपर्सचे चेअरमन सागर कांचन सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पक्षाची ध्येय धोरण व पक्षाचा स्वाभिमान विचार जनसामान्यापर्यत पोहचविण्याचा प्रयत्न करुन संघटन वाढविण्यासाठी पक्षातील सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद वैराट यांनी बोलताना व्यक्त केले.

Previous articleदौंड पोलिसांकडून बॉम्ब सदृश्य आपत्तीजनक घटनेचे प्रात्यक्षिक
Next articleमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन