दौंड पोलिसांकडून बॉम्ब सदृश्य आपत्तीजनक घटनेचे प्रात्यक्षिक

दिनेश पवार , दौंड

दौंड पोलीस स्टेशन येथे अचानक बॉम्ब सदृश्य किंवा एखादी आपत्तिजनक घटना घडली तर काय करावे याचे प्रात्यक्षिक दुपारी घेण्यात आले. याप्रसंगी दुपारी गुरुदत्त डेरी यामध्ये एक बेवारस बॅग आहे त्याची माहिती एका इसमाने फोन करून पोलीस स्टेशनला कळवली व पोलिसांनी त्या बॅगमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आहे का याची तपासणी करणे करता बॉम्ब शोधक पथक पुणे यांना पाचारण केले हे पथक दौंड येथे येऊन पूर्ण बॅगची तपासणी केली याचे प्रात्यक्षिक आज घेण्यात आले.

याप्रसंगी यावेळी दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे पोलीस उपनिरीक्षक महेश आबनावे सहाय्यक फौजदार दिलीप भाकरे पोलीस हवालदार पांडुरंग थोरात पोलीस नाईक अमीर शेख सचिन बोराडे अण्णासाहेब देशमुख निखिल जाधव अमोल गवळी तसेच दौंड कडील महिला पोलीस कर्मचारी व बॉम्ब शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सागवेकर सहाय्यक फौजदार जगताप पोलीस हवालदार पुंड मगर फटांगडे व जाधव असे हजर होते

Previous articleमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा झेंडा
Next articleपुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या उपाध्यक्षपदी आनंद वैराट यांची निवड: खा.कोल्हे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र