महावितरणचे अधिकारी व शेतकऱ्यांची एकत्रित बैठक

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिवसेना शिव सहकार सेनेच्या वतीने पूर्व हवेली तालुक्यातील तीन दिवसांपासून बंद असलेला शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. शेतकरी आणि विद्युत महावितरणची एकत्रित बैठक घेऊन तोडगा निघाला. शेतकऱ्यांच्या थकीत विजबिलामुळे गेली तीन दिवस महावितरणकडून थ्री फेज कनेक्शन बंद करून सिंगल फेज चालू ठेवले होते. यांने शेतकऱ्यांच्या मोटार चालू होत न्हवत्या थ्री फेज वीजपुरवठा बंद असल्याच्या तक्रारी आळंदी, सोरतापवाडी सह अनेक भागातील शेतकऱ्यांनी केल्याने आज तातडीने महावितरण अधिकारी व शेतकरी यांची एकत्रित बैठक घेतली व शेतकऱ्यांना बिल भरण्यासाठी टप्पे करून देण्याची विनंती केली असल्याची माहिती शिवसेना सहकार सेना पुणे जिल्हा उप प्रमुख स्वप्नील कुंजीर पाटील दिली.

महावितरणच्या वतीने बैठकीत टप्पे करून दिले टप्पे करुन दिलेली रक्कम तात्काळ शेतकऱ्यांनी चालू बैठकीतच रोख व चेक स्वरूपात महावितरणचे कनिष्ठ अभियंता हाजीमलंग बागवान यांच्याकडे जमा केली. सुमारे चार लाख पस्तीस हजार रुपये चेक व रोख स्वरूपात बैठकीत गोळा झाल्याचे महावितरणचे कनिष्ठ अभियंता हाजीमलंग बागवान यांनी सांगितले. शिवसेनेची मध्यस्थी कामी आल्याने उपस्थित शेतकरी व महावितरण कर्मचारी यांनी आभार मानले व वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

यावेळी शेतकरी प्रमोद शहा, संजय धुमाळ, राहुल जवळकर, दीपक शिंदे, जीवन जवळकर, मोहन खेंग्रे, कुणाल शहा, महादेव शिंदे, विशाल चौधरी, शुभम चोरघे, संतोष शिंदे, मोहन लोले, दत्तात्रय क्षीरसागर, महावितरणचे कनिष्ठ लिपिक एस के दरेकर, वायरमन अनिकेत चौधरी, वरिष्ठ तंत्रज्ञन निलेश भोंडवे, संभाजी खटाटे, सह मान्यवर उपस्थित होते.

Previous articleगावठी कट्ट्यासह सराईत जेरबंद: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Next articleमहात्मा फुले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सीताराम नरके यांची निवड : राज्यस्तरीय चौदावे संमेलन २७ नोव्हेंबरला खानवडीला होणार