कोरेगावमुळ मध्ये भक्तीभावपूर्ण काकड आरतीचा समारोप

अमोल भोसले,उरुळी कांचन

गेली महिनाभर काकड आरती चालू असल्याने या कार्यक्रमाचा सांगता समारोप मारुती मंदिरापासून, मुळा, मुठा नदी किनाऱ्यापर्यंत तुलसी, कलश, विना, पकवाद, व टाळांच्या गजरात दिंडी काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाप्रसाद व भोजन भक्तांना व ग्रामस्थांना कोरेगावमूळचे उद्योगपती सोपानराव साधू शितोळे यांच्या वतीने देण्यात आले. गेली महिनाभर काकड आरतीला जे हभप उपस्थितीत राहिले व उत्तम प्रकारे नियोजन केले त्या हभप चा सन्मान ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आला

यावेळी सरपंच विठ्ठल शितोळे, उपसरपंच लिलावाती बोधे, ग्रामपंचायत सदस्य बापुसाहेब बोधे, मनिषा कड, अश्विनी कड, भानुदास जेधे, दत्तात्रय काकडे, सचिन निकाळजे, संतोष काकडे, प्रफुल्ल पवार, तंटामुक्ती अध्यक्ष संपत डिंबळे, पोलीस पाटील वर्षा कड, ठकशेन कड, ताराचंद कोलते, दशरथ गायकवाड, नितीन कड, शरद शितोळे, जयसिंग भोसले, विठ्ठल कोलते, नंदकिशोर कड, बाळकृष्ण कोलते, जालिंदर कड, प्रविण शितोळे, गणेश शितोळे, अशोक कांंरडे, कचरु कड, सचिन कड, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, आजी-माजी पदाधिकारी, विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे आजी – माजी चेअरमन – सदस्य, सर्व जेष्ठ नागरिक, समस्त ग्रामस्थ, महिला भगिनी व भाविक भक्त यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

Previous articleमहाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत लोणी काळभोर येथे ऊस पाचट व्यवस्थापन सप्ताह साजरा
Next articleकायम व कंत्राटी वीज कामगारांचा एसटी आंदोलनाला पाठिंबा