कायम व कंत्राटी वीज कामगारांचा एसटी आंदोलनाला पाठिंबा

कुरकुंभ -सुरेश बागल

वीज उद्योगातील हजारो वीज कामगारांच्या वतीने गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्य परिवहन महामंडळ कामगारांच्या आंदोलनाला आझाद मैदानात जाऊन प्रत्यक्ष पाठींबा देण्यात आला.

सर्वसामान्य माणसाला एस टी चा प्रवास अत्यंत विश्वासाचा वाटतो, एस टी म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचे हृदयच कारण जशी रक्तवाहिनी शरीराच्या प्रत्येक भागाला रक्त पुरवठा करते अगदी तसेच राज्यातील काना कोपऱ्यात प्रवाश्यां च्या सोयी साठी एस टी वाहतुकीची वाहिनी कार्यरत आहे.

या एस टी कामगारांच्या विविध मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. खाजगीकरण झाल्यास पुढील काळात मोठ्या प्रमाणात प्रवासासाठी तिकिटाचे चे दर वाढतील परिणामी याचा भार सर्वसामान्य प्रवाशांनाच सोसावा लागेल. त्यामुळे सरकारने खाजगीकरण न करता विलीनकरण करावे व सर्व कामगारांच्या सह सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे वतीने करण्यात आली.

खाजगीकरण केल्यास जनतेच्या रोषालाला सामोरे जावे लागेल ते न करता राज्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी एस टी कामगारांना शासनात विलीनकरण करून कामगारांना देखील सरकारने न्याय दिला पाहिजे.

त्यांच्या या मागण्या करिता
भारतीय मजदूर संघ संलग्नित वीज कामगार महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ)आणि
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने (संलग्न भारतीय मजदूर संघ)या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी पुणे, कोल्हापूर, जळगाव, मुंबई, जालना येथे आधीच पाठींबा दिला होता.

वीज महामंडळ व एस टी महामंडळाची स्थापना एकाच वेळी झाली, गाव तेथे एस टी आणि घर तेथे वीज अशा जनहित सेवा खाजगीकरण झाल्यावर मिळणार नाही या साठी जनतेचा देखील सहभाग या आंदोलनात झाला पाहिजे. एस. टी .कामगार यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा न निघाल्यास वीज कंत्राटी कामगार देखील या आंदोलनात सक्रिय पाठिंबा देत प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे व संघटन मंत्री राहुल बोडके यांनी दिला आहे. वीज कामगार महासंघाचे निवासी सचिव प्रशांत भांबुर्डेकर या वेळी उपस्थित होते.

Previous articleकोरेगावमुळ मध्ये भक्तीभावपूर्ण काकड आरतीचा समारोप
Next articleजागतिक पुरुष दिन अनोख्या पद्धतीने महानगरीत साजरा:आपला आवाज न्यूज नेटवर्क व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांचे आयोजन