पोलीस पाटील संघाच्या पुणे जिल्हा सदस्यपदी सिमा यादव ; संघटकपदी नामदेव डोंगरे यांची निवड

पवनानगर – महाराष्ट्र राज्य गांव कामगार पोलीस पाटील संघाच्या पुणे जिल्हा सदस्य पदी काले काँलनी येथील पोलीस पाटील सिमा गणेश यादव यांची निवड करण्यात आली आहे तर प्रभाचीवाडी येथील पोलीस पाटील नामदेव डोंगरे याची पोलीस पाटील संघाच्या संघटक पदी निवड करण्यात आली आहे.निवडीचे पत्र राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

यावेळी राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, उपाध्यक्ष संजय जाधव पाटील,जिल्हा अध्यक्ष साहेबराव राळे, तालुका अध्यक्ष लक्ष्मण शितोळे पाटील,पोलीस पाटील सुनील कालेकर, अनंता खैरे,प्रल्हाद घारे,भरत साबळे,रोशना गोणते,वैशाली काळे, संतोष खैरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुत्रसंचालन सुनील कालेकर पाटील यांनी केले तर आभार प्रल्हाद घारे यांनी केले,

Previous articleउरुळी कांचन मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा
Next articleमराठी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी सरकारचे पाठबळ उभे करु – नाना पटोले