भाजपच्या ओबीसी शहर अध्यक्षपदी भानुदास जगताप यांची तर सचिन शेलार यांची भाजपच्या शहर विद्यार्थी उपाध्यक्षपदी निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

भानुदास बाळासाहेब जगताप यांची भारतीय जनता पार्टी उरुळी कांचन (ता.हवेली) शहर ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी निवड तर कु.सचिन संपत शेलार यांची भारतीय जनता पार्टी उरुळी कांचन शहर विद्यार्थी आघाडी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी भाजपचे हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण काळभोर, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र व्यापारी विभागाचे अध्यक्ष विकास जगताप, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, भाजपचे शहर अध्यक्ष अमित कांचन, भाजपचे शहर विद्यार्थी अध्यक्ष ऋषीकेश शेळके, भाजपचे सोशल मीडिया शहर अध्यक्ष शुभम वलटे आदी उपस्थित होते.

Previous articleनारायणगावात ऊसाच्या फडात बिबट्याचे बछडे दाखल
Next articleआळेफाट्याजवळ कंटेनरची कारला धडक बसून एक ठार ,तिघे जखमी