आळेफाट्याजवळ कंटेनरची कारला धडक बसून एक ठार ,तिघे जखमी

नारायणगाव – किरण वाजगे

पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा येथील निसर्ग
हाॅटेल समोर एका अज्ञात मालवहातुक करणाऱ्या कंटेनरने मोटार कारला धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये एकजण ठार झाला. तर तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी ( दि १४) रोजी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमरास घडली.

याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावर आळेफाट्यावळ नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या एका अज्ञात मालवाहतूक करणाऱ्या कंटनेनरने पुढे चाललेल्या मोटार कारला ( क्रमांक एम एच १२ टी एन २५२० ) जोरात धडक दिली त्यामुळे ही कार महामार्गाच्या कडेला संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या दगडांना धडकून सुमारे दहा ते पंधरा फूट खोल खड्ड्यात जाऊन पडली या अपघातामध्ये संकेत प्रल्हाद आहेर वय १९ वर्षे ) रा.आकुर्डी पुणे हा तरुण ठार झाला. तर निखील बाळकृष्ण धारराव ( वय २५ वर्षे) अश्विनी बाळकृष्ण धारराव (वय २९ वर्षे ) आणि तेजस्विनी बाळकृष्ण धारराव (वय २७ वर्षे सर्व रा..सी. ४०३, ज्ञानगंगा काँप्लेक्स शिवशक्ती चौक, नखातेवस्ती, रहाटणी पुणे मुळ रा.जोपुळ ता.दिंडोरी जि.नाशिक) हे तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील खाजगी हाॅस्पीटलमध्ये प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले.

या अपघातची फिर्याद निखील बाळकृष्ण धारराव (वय २५ वर्षे ) यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिली असून या फिर्यादीवरुन आळेफाटा पोलिसांनी अज्ञात मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर करत आहेत.

Previous articleभाजपच्या ओबीसी शहर अध्यक्षपदी भानुदास जगताप यांची तर सचिन शेलार यांची भाजपच्या शहर विद्यार्थी उपाध्यक्षपदी निवड
Next articleलिंगाळी-मलठण जिल्हा परिषद गटात गावं तिथे पाटी उपक्रम