लिंगाळी-मलठण जिल्हा परिषद गटात गावं तिथे पाटी उपक्रम

दिनेश पवार,दौंड

लिंगाळी, मलठण जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गाव,वाडी,वस्ती तिथे पाटी असा अभिनव उपक्रम जिल्हा परिषद पुणे अंतर्गत जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे,या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, सभापती हेमलता फडके यांच्या हस्ते संपन्न झाला.

गावाचे नामनिर्देशन करणारा फलक व त्यावर झाडे लावा,झाडे जगवा हा पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन देणारा महत्वपूर्ण संदेश देण्यात आला आहे.

गटातील सर्व वाड्या, वस्त्या,गाव येथे हे नामनिर्देशीत फलक लावण्यात येणार आहेत,गटाचा सर्वांगीण दृष्टिकोनातून विकास साधणे, शेतकऱ्यांना भरीव मदत करणे, युवक,महिलांना स्वावलंबनासाठी प्रोत्साहन देणे,पात्र योजनेचा लाभ मिळवून देणे,गावातील धार्मिक, सामाजिक वातावरण राखण्यासाठी भजन साहित्य वाटप करणे अशा वेगवेगवेगळ्या माध्यमातून वीरधवल जगदाळे यांनी काम केले आहे नि पुढेही असेच विधायक कार्य करणार असल्याचे यावेळी जगदाळे यांनी सांगितले.

 दौंड पंचायत समिती सभापती हेमलता फडके,उपसभापती विकास कदम,पंचायत समिती सदस्य ताराबाई देवकाते,दौंड नगरपरिषदचे नगरसेवक इंद्रजीत जगदाळे, दत्तात्रय पाचपुते, लिंगाळी चे सरपंच सुनील जगदाळे, आदी मान्यवर उपस्थित होते

Previous articleआळेफाट्याजवळ कंटेनरची कारला धडक बसून एक ठार ,तिघे जखमी
Next articleराज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून भरभराट करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडं