राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक,न्याय विभाग दौंड शहर च्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी साजरी

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जयंतीनिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संत गाडगे महाराज चौक दौंड पोलीस स्टेशन समोर संविधान स्तंभ याठिकाणी दौंड पोलीस निरीक्षक श्री सुनील महाडिक साहेब तसेच सामाजिक कार्यकर्ते मा.श्री विनायक माने ,दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कंट्रोल रूम श्री मधुकर राव पवार साहेब, दौंड नगरपालिकेचे गटनेते श्री बादशा भाई शेख ,माजी नगरसेवक श्री उत्तमराव सोनवणे, श्री साहेबराव पोळ, श्री भास्कर राव सोनवणे, श्री आण्णा चव्हाण, श्री यादवराव जाधव यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी दौंड शहराध्यक्ष श्री दिपक सोनवणे, श्री प्रकाश जाधव, श्री विनोद लवटे, श्री अनिल व्हंकाडे, श्री उमेश पाल,श्री लक्ष्मण बचगौंडी,श्री महादेव माने, श्री , सुधीर किरवे, श्री अक्षय सोनवणे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री यादव जाधव यांनी केले.

Previous articleउन्हाळा सुट्टीतील कामकाजाबद्दल शिक्षकांना अर्जित रजा मंजूर करावी-गौतम कांबळे
Next articleजुन्नर तालुक्यात आज २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न