उन्हाळा सुट्टीतील कामकाजाबद्दल शिक्षकांना अर्जित रजा मंजूर करावी-गौतम कांबळे

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी उन्हाळा सुट्टीच्या कालावधीत covid-19 च्या संदर्भात तपासणी नाक्यावर ,कोरोणा रुग्ण शोध मोहीम व स्वस्त धान्य दुकानात निरीक्षक म्हणून कामकाज केले आहे .हे कामकाज करत असताना शिक्षकांना आपली हक्काची उन्हाळा सुट्टी घेता आली नाही त्यामुळे आपण या कालावधीत कामकाज करणाऱ्या सर्व शिक्षकांना उन्हाळी सुट्टीच्या कालावधीएवढी अर्जित रजा मंजूर करावी अशी मागणी गौतम कांबळे राज्य महासचिव महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघप्रणित शिक्षक आघाडी यांनी निवेदनाद्वारे केली आहे .

हे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , ग्रामविकासमंत्री ,शालेय शिक्षण मंत्री ,ग्रामविकास सचिव व दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांना दिले आहे .यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री आप्पा जगताप महासचिव राजेंद्र गायकवाड उपस्थित होते .

Previous articleबॅक ऑफ इंडियाच्या उरुळी कांचन शाखेत ग्राहकांची गैरसोय; कार्यालयीन कारभाराचा होतोयं ग्राहकांना त्रास
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक,न्याय विभाग दौंड शहर च्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी साजरी