सेवानिवृत्त जवानाचा हिंगणगाव ग्रामस्थांनी केला भव्य जाहीर सत्कार

अमोल भोसले,उरुळी कांचन

बाबुराव पांडुरंग थोरात हे २००४ साली भारतीय स्थलसेने मध्ये फौजी या पदावर कार्यरत झाले त्यांनी आपल्या देशाची सेवा करताना आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश,चंदिगड, जम्मु कश्मिर, पुणे या ठिकाणी देशसेवेसाठी आपली ड्युटी बजावली आणि आपला भारतीय सेवेचा सतरा वर्षांचा कार्यकाळ संपुर्ण केला आणि तो कार्यकाळ यशस्वी रित्या पार पाडुन गावामध्ये आल्यानंतर हिंगणगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांची जंगी मिरवणूक काढुन गावकऱ्यांनी त्याचा जंगी सत्कार सोहळा केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या शुभहस्ते फौजी बाबुराव पांडुरंग थोरात यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, पंचायत समितीचे सदस्य शाम गावडे, सरपंच दिपक गावडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष भरत गडदे, हिंगणगावच्या विद्यमान सरपंच विद्या थोरात, माजी सरपंच कुंडलीक थोरात, मा.सरपंच अंकुश कोतवाल, मा.सरपंच गोरख थोरात, कुंडलीक पा.थोरात, विजय गायकवाड, ह.ता.रा.यु.कॉगेस सचिव माऊली थोरात, सुभाष गायकवाड, अमोल गायकवाड, उपसरपंच सुखदेव कांबळे, शशिकला पोपळघट, लंका वेताळ, गोरख तांबे, नामदेव गडदे, सागर शेलार, तुकाराम शेंडगे, मारुती बरकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक काळुराम थोरात यांनी केले तर आलेल्या मान्यवरांचे आभार गोरक्ष थोरात यांनी मानले.

Previous articleबैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अपिलावर १५ नोव्हेंबरला सुनावणी होणार- खा.डॉ.अमोल कोल्हे
Next articleनामदेव भोसले यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर