नामदेव भोसले यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर

अमोल भोसले,उरुळी कांचन

मराठी साहित्य मंडळ आयोजित
तिसरे राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर संमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला.

सदर साहित्य संमेलनाची रूपरेषा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सकाळी ग्रंथदिंडी होईल दुपारी कवी संमेलन व परिसंवाद कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्य भूषण पुरस्कार व समाज भूषण पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नामवंत सत्कारमूर्तीचा संन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती मराठी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजकांकडून करण्यात आली आहे.

Previous articleसेवानिवृत्त जवानाचा हिंगणगाव ग्रामस्थांनी केला भव्य जाहीर सत्कार
Next articleहिंगणगाव मध्ये आरोग्य शिबीर संपन्न