आमदार राहुल कुल व मा.आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाकर जगताप यांच्या वतीने वृक्षारोपण

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिंदेवाडी (ता.हवेली) आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर व हाडवैद्य राहुल डेरे यांच्या हस्ते आमदार राहुल कुल व शिरुर-हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या वाढदिवसा निमित्त २५१ लागवडीची सुरुवात करण्यात आले. बहुपयोगी वृक्ष लक्ष्मीतरु शिंदेवाडी मध्ये २५ हजार वृक्षलागवड करण्यात आलेले गेल्या पाच वर्षांमध्ये सातत्य ठेवून वृक्ष संगोपन व संवर्धन ही मोहिम हाती घेतलेली आहे. शाश्वत विकास फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर जगताप यांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी लागणारे वृक्ष मोफत देण्यात येत आहे तसेच गावातील ग्रामपंचायतचे सरपंच संदीप जगताप यांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी बहुपयोगी मदत या ठिकाणी मिळत आहे.

हिंगणगावचे माजी सरपंच अंकुशराव कोतवाल यांचे सहकार्य मिळत आहे. शिंदेवाडी खाद्य तेलामध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी हा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहे तसेच शिंदेवाडी प्रमाणे इतर गावांमध्ये वृक्ष लागवडीचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. लक्ष्मीतरु वर्ष हे बहुउपयोगी झाड असून त्याच्यापासून कॅन्सर बरा होतो. डायबिटीज चिकनगुनिया मलेरिया होणे असे विविध प्रकारचे २४ रोग प्रकारचे आजार या मुळे बरे होतात आणि ही माहिती इतरांना देण्यासाठी शास्वत विकास फाउंडेशन नेहमीच प्रयत्न करीत आहेत. तसेच पुणे व सातारा जिल्ह्यामध्ये वृक्षरोपण केलेल्या गावांमध्ये शाश्वत विकास फाउंडेशन तर्फे श्री श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात बक्षीस व मदत होणार आहे. यावेळी शाश्वत कार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर जगताप तसेच इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. यावेळी सामाजिक सेवक वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे, मराठी पत्रकार परिषद कार्याध्यक्ष शरद पाबळे उपस्थित होते. त्यांनी लक्ष्मितरु वृक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड करून संगोपनासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

Previous articleसिद्धेगव्हाण ग्रामस्थांकडुन सचिन ओहोळ यांचा सन्मान व मिरवणूक
Next articleबैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अपिलावर १५ नोव्हेंबरला सुनावणी होणार- खा.डॉ.अमोल कोल्हे