सिद्धेगव्हाण ग्रामस्थांकडुन सचिन ओहोळ यांचा सन्मान व मिरवणूक

चाकण- सिद्धेगव्हाण येथे ग्रामस्थांनी युपीएससी परीक्षेतुन भारतीय वन सेवेच्या निवड झालेल्या सचिन ओहोळ यांचा आई-वडीलांसह सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली. तर पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते मुगुटराव मोरे यांनी सचिन ओहोळ यांचा जीवनपट उलगडून सांगितला. तर नवनियुक्त अधिकारी सचिन ओहोळ यांनी ‘स्पर्धा परीक्षांना कसे सामोरे जावे..??’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी युवा नेते मयूर मोहिते, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे, युवा उद्योजक उमेश मोरे, मा.चेअरमन अनिल साबळे, उपसरपंच अशोक गंगावणे मा.उपसरपंच अशोक मोरे, नितीन गाडे, अविनाश मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

तसेच पोलिस पाटील वाल्मिकराव साबळे,भारतीय सैनिक धनंजय धाऊत्रे, आण्णासाहेब ओहोळ, बाळासाहेब देशमुख, दौलत मोरे, पंडितराव मोरे, संतोष मोरे, पर्यावरण समिती अध्यक्ष जयसिंग धाऊत्रे,आनंद साबळे, मनोज मोरे, रणजित मोरे, सचिन मोरे, , प्रफुल्ल साबळे,कैलास साबळे, अनिल खलाटे,नितीन साबळे इ. ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे व आभार मुगुटराव मोरे यांनी मानले.

Previous articleश्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयात (सन १९९२-९३ ) एसएससीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात
Next articleआमदार राहुल कुल व मा.आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाकर जगताप यांच्या वतीने वृक्षारोपण