दौंड आगाराचे कर्मचारी बेमुदत संपावर

दिनेश पवार,दौंड

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे यासाठी दौंड आगाराचे कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती दत्तात्रय तिगोटे, अमोल पवार, अमोल आटोळे, शैलेश मोरे, गणेश जागडे, पांडुरंग काटे, अंकुश तुरे, प्रविण कारंडे, राजेंद्र लडकत, शिवाजी कदम, जगन्नाथ खराडे यांनी दिली.

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना कमी पगार व कामाचा अतिरिक्त ताण व अनियमित वेतनामुळे 36 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे राज्यातील सर्व कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेने दि. 4/11/2021 पासून बेमुदत संप पुकारला आहे त्यामुळे दौंड आगारातील कामगार सुध्दा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत त्यामुळे राज्य सरकारने लवकरच निर्णय घ्यावा अशी कामगारानी विनंती केली आहे.

कामगारांच्या संपास पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील विवीध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देवून पाठिंबा दर्शवला आहे, विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही असे कामगारांच्या वतीने सांगण्यात आले

Previous articleमराठी पत्रकार परिषदेच्या विविध पुरस्कारांची घोषणा; पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव
Next articleविकास दादा ठाकूर मित्र परिवार आयोजित किले बनवा स्पर्धेत धामणेच्या आदेश कोळेकरने पटकावला प्रथम क्रमांक