विकास दादा ठाकूर मित्र परिवार आयोजित किले बनवा स्पर्धेत धामणेच्या आदेश कोळेकरने पटकावला प्रथम क्रमांक

चाकण- दिवाळीनिमित्त खेड तालुक्यातील 20 गावांमध्ये किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन विकास दादा ठाकूर मित्र परिवाराकडून करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज पिंपरी ग्रामपंचायत येथे संपन्न झाला. या बक्षिस वितरणास जिल्हा परिषद सदस्य शरदराव बुट्टे, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, पंचायत समिती सदस्या ज्योतीताई अरगडे,तालुका आरोग्य अधिकारी पुनम चिखलीकर उपस्थित होते. या स्पर्धेत 234 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.


स्पर्धेत प्रथम क्रमांक आदेश अरुण कोळेकर (धामणे), द्वितीय क्रमांक यशवर्धन लिंबाजी कार्ले (चांदूस), तृतीय क्रमांक गौरव अनिल चौधरी(किवळे), चतुर्थ क्रमांक प्रज्वल सुरेश सावंत(शिरोली), पाचवा क्रमांक ओम कुलदीप वाळुंज (पिंपरी बु||) यांनी पटकावला.

यावेळी कोरोना काळात काम करणारे आरोग्य अधिकारी, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व पोलीस पाटील यांना कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात आरोग्य सेवक कै. योगेश रसाळ व कै. शिवभक्त रोहीदास हुंडारे यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. प्रास्ताविक आयोजक विकास दादा ठाकूर यांनी केले. सूत्रसंचालन आदेश टोपे यांनी व आभारप्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य धोंडीबा वाळुंज यांनी केले.

Previous articleदौंड आगाराचे कर्मचारी बेमुदत संपावर
Next articleसावरदरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना फराळ व मिठाई वाटप