युग पुरूषांचे विचार नविन पिढीने आत्मसात करावे जेष्ठ- समाजसेवक डॉ रविंद्र भोळे

अमोल भोसले,उरुळी कांचन

सरदार वल्लभभाई पटेल यांनी कणखरपणा अंगी बाळगून राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचा मंत्र देशाला दिला. राष्ट्रीय एकात्मतेसठि सरदारांनी महान व अभुतपूर्व कार्य केले,त्यामूळे भारत देश एकसंध राहीला. राष्ट्रसेवा कशी असते ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल होते. पटेलांची जयंती साजरी करणे म्हणजे विभूती पुजा आहे. युग पुरुषांनी समर्पित भावनेने निरपेक्ष पणे सेवाव्रती कार्य करुन निस्काम कर्मयोगाचा व राष्ट्रसेवा ,राष्ट्रभक्तीचा महान संदेश दिला. अश्या युग पुरुषांचे विचार नविन पिढीने आत्मसात करावे. सरदारांचा कणखरपणा अंगी बाळगावा असे मत जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे संस्थापक अध्यक्ष सरदार पटेल एल पी समाज मंडळ उरुळी कांचन ,डॉ मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट ह्यानी येथे व्यक्त केले.

सरदार वल्लभ् भाई पटेल ह्यांच्या जयंती निमित्तने येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या वेळी मार्गदर्शन करताना वरिल मत व्यक्त केले. ह्या प्रसंगी दीपप्रज्वलन करुन सरदारांच्या प्रतिमेला पुस्पहार अर्पण करण्यात आला. ह्या कार्य कार्यक्रमाला सुनिल महाजन, दिपक फेगडे, विजय वारके, मेहुल फेगडे, पियुश महाजन , पुनित महाजन, अस्मिता पतसंस्थेच्या संचालक संगीता भोळे, डॉ अपुर्वा रविंद्र भोळे, गौरव भोळे उपस्थीत होते.

Previous articleखासदार डॉ.अमोल कोल्हे मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष
Next articleआगामी जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणूका मध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे या दूष्टीने प्रयत्न करावा- संदिप भोंंडवे