येळसे जिल्हा परिषद शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण कडू यांची निवड

पवनानगर- पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळसे येथे (दि.२१ ) आक्टोबर रोजी पालकसभा घेण्यात आली.यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले.यामध्ये १५ सदस्यांची निवड करण्यात आली.यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी चिठ्ठी टाकून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये अध्यक्ष म्हणून लक्ष्मण पांडुरंग कडू व उपाध्यक्ष म्हणून ऋतुजा दत्ता कालेकर यांची चिठ्ठी टाकून निवड जाहीर करण्यात आली.

अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा शाळेच्या वतीने श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.अशा खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली.

Previous articleबी.डी.काळे महाविद्यालयाच्या कु.प्रियांका सुतार हिचा विद्यापीठ पातळीवरील निबंधलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक
Next articleकानगांव ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीत