बी.डी.काळे महाविद्यालयाच्या कु.प्रियांका सुतार हिचा विद्यापीठ पातळीवरील निबंधलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक

घोडेगाव – देवळाली कॕम्प, नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचालित, श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयात श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया ६ व्या विद्यापीठ पातळीवर संपन्न झालेल्या निबंधलेखन स्पर्धेत बी.डी.काळे महाविद्यालयातील तृतीय वर्ष विज्ञान या वर्गातील विद्यार्थिनी कु.प्रियांका गुलाब सुतार हिने प्रथम क्रमांक संपादित केला आहे.रू.४००१/- व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.

तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.सुरेशशेठ काळे, उपाध्यक्ष मा.तुकाराम काळे, कार्याध्यक्ष मा.शिवाजीराव घोडेकर,सचिव अॕड.मुकूंद काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर, प्राचार्य डॉ.आय.बी.जाधव,सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवक यांनी तिचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

प्रा.डॉ.पुरुषोत्तम काळे,प्रा.सचिन घायतडके,वर्गशिक्षक प्रा.विश्वास कोकणे इ.नी तिला मार्गदर्शन केले आहे.

Previous articleमहाराष्ट्र राज्य व्यवसायिक पुरस्कारने महिलांचा सन्मान, खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते वितरण
Next articleयेळसे जिल्हा परिषद शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण कडू यांची निवड