वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी या उपाययोजना करा – उपविभागीय पो. अधिकारी मंदार जावळे

नारायणगाव : किरण वाजगे

वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी व्यापारी, दुकानदार, पोलीस पाटील तसेच महिला दक्षता कमिटी यांच्या बैठकीचे आयोजन नारायणगाव पोलिस स्थानकात आज दुपारी करण्यात आले.

नारायणगाव व परिसरात छोट्या मोठ्या चोर्‍या तसेच ज्वेलर्स दुकाने फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. नारायणगाव बस स्थानकाजवळ असलेल्या व नव्यानेच सुरू झालेल्या प्रथमेश ज्वेलर्स या मोठ्या दुकानावर मागच्या बाजूने भिंतीला भगदाड पाडून दरोडा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न दोनच दिवसांपूर्वी घडला होता. त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांनी ज्वेलर्स दुकानदार, व्यापारी व पत्रकारांची नारायणगाव पोलीस स्थानक आवारात असलेल्या सभागृहात आज बैठक आयोजित केली.

या बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीला व्यापारी, पत्रकार, ज्वेलर्स दुकानदार उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी मंदार जावळे यांनी व्यापाऱ्यांना विविध प्रकारच्या सूचना दिल्या. यामध्ये सीसीटीव्ही बसवणे, सुरक्षारक्षक ठेवणे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कशा प्रकारे उपाययोजना कराव्यात याबाबत माहिती दिली.

यावेळी ज्वेलर्स दुकानदार पप्पू चोरडिया, मच्छिंद्र मुंडलिक, न्यानदेव डहाळे, किशोर महाले, सचिन नागरे, मनिष नागरे, शरद बेलसरकर, भैरवसिंग राजपुरोहित, प्रथमेश जवळेकर, शेखर शेटे, अजित वाजगे हे व्यापारी तसेच दक्षता समितीच्या सदस्या वैजयंती कोराळे, प्रीती शिंगोटे, सिम्मी शेख, अंजली साठे, प्रगती सोनवणे, रेखा गुंजाळ, लता कुंभार तसेच पोलीस पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी केले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी आभार मानले.

Previous articleअष्टविनायकापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र थेऊर येथील चिंतामणी मंदिरात भाविकांची गर्दी
Next articleमहाराष्ट्र राज्य व्यवसायिक पुरस्कारने महिलांचा सन्मान, खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते वितरण