पै.गणेश बोत्रे युथ फाउंडेशनच्या वतीने गोरगरीब रूग्णांसाठी रुग्णवाहिका ; आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते रूग्णवाहिकीचे लोकार्पण

चाकण- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पै.गणेश बोत्रे युथ फाऊंडेशन व पै.प्रतिक जाधव मित्र परिवाराच्या वतीने रुग्णांची रुग्णवाहिके अभावी होणारी हेळसांड थांबावी. त्याचा फायदा गोरगरीब रुग्णांना व्हावा. या उदात्त हेतूने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते येथील चाकण तळेगाव मार्गावरील एचपी चौक याठिकाणी संपन्न झाला.

यावेळी महाळुंगे पोलिस चौकीचे चौरे साहेब ,युवा नेते मयुर मोहिते ,कुशल जाधव, सरपंच हिराबाई बोत्रे,उपसरपंच सौ.कल्पनाताई गाडे ,बाबुराव नाणेकर ग्रा.पं सदस्य,नितीन नाणेकर उपसरपंच,विशाल तुळवे,दिपक लिंभोरे,अनिकेत पाचपुते, साईनाथ पाचपुते, नितीन फलके, रंजित गाडे, मनोज  खराबी, लिलाधर तुपे,दिलिप बोत्रे, संदीप बोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते

Previous articleआमदार बेनके, माजी आ. सोनवणे, आशाताई बुचके व सत्यशिल शेरकराच्या दारात दिवाळी पूर्वी शिमगा..?
Next articleजिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांना कलम 36 अन्वये अधिकार प्रदान