सरपंचवस्ती येथे पोलीस चौकी सुरू करण्याची नगरसेवकांची मागणी

दिनेश पवार,दौंड – शहरातील वाढत्या चोऱ्या,दरोडे यामुळे प्रभाग क्रमांक 10,सरपंचवस्ती येथे लवकरात लवकर पोलीस चौकी सुरू करावी अशी मागणी दौंड नगरपालिकेचे नगरसेवक राजेश गायकवाड, जीवराज पवार,ज्योती राऊत यांनी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.

सरपंच वस्ती येथील परिसरात शहरीकरण झपाट्याने वाढत आहे, आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा याठिकाणी उपलब्ध होत असल्याने या परिसरास राहण्यासाठी नागरिक पसंदी देत आहे,याठिकाणी नेहमी रस्त्याने गर्दी असते या भागात चोऱ्या, दरोडे चे प्रमाण वाढत आहे,त्यामुळे या परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकी सुरू करणे गरजेचे आहे, तरी ती त्वरित सुरू करावी अशी मागणी येथील नगरसेवकांनी केली आहे

Previous articleदौंड मध्ये शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश
Next articleमनसेच्या स्टिंग ऑपरेशनमुळे रेशन दुकानदारांची उडाली भंबेरी