भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या हवेली तालुका अध्यक्षपदी अतुल शेलार यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोरेगावमुळ (ता.हवेली) अतुल दत्तात्रय शेलार यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा हवेली तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री भाजपा रवी आनासपुरे, प्रदेश सरचिटणीस – भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा मोहन वानखंडे, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव भाजपा अनुसूचित जाति मोर्चा सारिका किशोर लोणारी, पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस अॅड. धर्मेंद्र खांडरे, अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाति मोर्चा पुणे जिल्हा मयूर चंद्रकांत कांबळे, उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाति मोर्चा पुणे जिल्हा किशोर रघुनाथ लोणारी, अध्यक्ष भाजपा उरुळी कांचन शहर विद्यार्थी आघाडी ऋषिकेश बाळासाहेब शेळके, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पक्षाचे विचार सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांना विश्वासात घेऊन राबविण्याचा प्रयत्न करणार असे नुतन पदाधिकारी अतुल शेलार यांनी सांगितले.

Previous articleराजगुरूनगर येथे दिल्ली येथील लेखक राकेश कुमार व सत्यशील राजगुरू यांची भेट
Next articleनारायणगाव मध्ये रोटरी जल परिषदेचे आयोजन