राजगुरूनगर येथे दिल्ली येथील लेखक राकेश कुमार व सत्यशील राजगुरू यांची भेट

राजगुरूनगर – दिल्ली येथील लेखक राकेश कुमार संस्थापक मातृभूमी सेवा संस्था तसेच हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू यांनी हुतात्मा राजगुरू ,भगतसिंग ,सुखदेव स्मृति स्थळ राजगुरूनगर बसस्थानक येथे भेट देऊन अभिवादन केले.यावेळी त्यांचे हुतात्मा राजगुरू प्रतिमा व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले गेले.

राकेश कुमार हे दिल्ली येथे शिक्षक असून शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती निर्माण होणे कामी मातृभूमी सेवा संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहेत.भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्ष दैनिक अभिवादन पूजा हेमंत वीरकर केली.

यावेळी प्रमुख पाहुणे राकेश कुमार तसेच सत्यशील राजगुरू यांनी विचार मांडले.

यावेळी अजिंक्य बकरे, अमर टाटीया,हेमंत वीरकर,प्रवीण गायकवाड,नरेश हेडा,श्रीराम खेडकर,पत्रकार सुनील थिगळे आदी उपस्थित होते.

राकेश सिंग व सत्यशील राजगुरू यांनी हुतात्मा राजगुरू जन्म स्थळ स्मारकास भेट दिली.तेथील माहिती घेऊन अभिवादन केले.
ऍड. निलेश आंधळे यांनी प्रास्ताविक केले ,मधुकर गिलबिले गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले.

Previous articleसमाजातील असुरी शक्तींचा नाश करण्यासाठी दुर्गा वाहिनी ची स्थापना – शितल ठुसे
Next articleभाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या हवेली तालुका अध्यक्षपदी अतुल शेलार यांची निवड