नारायणगाव शहरात दुर्गा दौड कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन

नारायणगाव,किरण वाजगे

बजरंग दल नारायणगाव प्रखंड व श्री शिव हिदुस्थान प्रतिष्ठान यांच्या वतीने नारायणगाव शहरात दुर्गा दौड कार्यक्रमाचे आज पहाटे उत्साहात आयोजन करण्यात आले.

दुर्गा दौड २०२१ या कार्यक्रमानिमित्ताने नारायणगाव येथील हनुमान मंदिरापासून मुक्ताई मंदिरापर्यंत ग्राम प्रदक्षिणा घालण्यात आली. पहाटे सहा वाजता सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमात स्वच्छ भारत अभियानाचे तालुकाध्यक्ष नामदेव आण्णा खैरे, मेजर उमेशजी अवचट, किरण काळभोर, शरद डोके, आकाश नेवकर, गणेश शिंदे, कृष्णा माने, अक्षय कसाबे, निलेश जंगम, बाळा दळवी, विशाल मावळे, पप्पू भूमकर, अनिकेत वाजगे, आदींसह महिला भगिनी, पंचक्रोशीतील बजरंगी व धारकरी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी दुर्गा दौडमध्ये सहभागी झालेल्या युवती व युवकांनी हातात तलवार घेऊन तसेच भगवा ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. “प्रभू श्री रामचंद्र की जय, वंदे मातरम, हिंदू धर्म की जय” अशा घोषणा देऊन शस्त्रपूजन करण्यात आले. विविध घोषणा तसेच प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. तरुणांचा उत्साह व जोश पाहून अनेक जण भारावून गेले.

Previous articleनारायणगाव शहरात दुर्गा दौड कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन
Next articleसमाजातील असुरी शक्तींचा नाश करण्यासाठी दुर्गा वाहिनी ची स्थापना – शितल ठुसे