समाजातील असुरी शक्तींचा नाश करण्यासाठी दुर्गा वाहिनी ची स्थापना – शितल ठुसे

नारायणगाव : किरण वाजगे

असुर दैत्यांचा नाश आई भवानीने दुर्गाष्टमीच्या दिवशी केला. त्याला अनुसरून समाजातील राक्षसी शक्तींचा नाश करण्यासाठी दुर्गा वाहिनी या संस्थेची स्थापना करण्यात आली असल्याचे प्रतिपादन समाज प्रबोधनकार शीतल ठुसे यांनी केले.

नारायणगाव (ता. जुन्नर) येथील श्री मुक्ताई देवीच्या मंदिरात आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे भीमाशंकर जिल्हा मंत्री संतोष खामकर, बजरंग दल विभाग संयोजक संदेश भेगडे, नारायणगाव शहरातील बजरंग दलाचे कार्यकर्ते, पंचक्रोशीतील मुक्ताई देवीचे भक्त, युवती, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सध्या इतस्ततः वावरत असलेल्या आधुनिक राक्षसांचा संहार करण्यासाठी तसेच स्त्री शक्तीला कणखर करण्यासाठी दुर्गा वाहिनी या राष्ट्र प्रेमी संघटनेची स्थापना अश्विन शुद्ध अष्टमी १९९२ साली करण्यात आली आहे. दुर्गा वाहिनी राष्ट्रप्रेमी युवती महिलांचे संघटन असून समाजातील विविध घटकातील स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दुर्गा वाहिनी हे संघटन हिरहिरीने सहभाग घेत असते. असेही ठुसे यांनी सांगितले दरम्यान युवतींनी आपल्यावर अन्याय झाल्यास दुर्गा वाहिनी संघटनेशी संपर्क करावा असे आवाहन यावेळी संयोजकांच्या वतीने करण्यात आले.

Previous articleनारायणगाव शहरात दुर्गा दौड कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन
Next articleराजगुरूनगर येथे दिल्ली येथील लेखक राकेश कुमार व सत्यशील राजगुरू यांची भेट